Headlines

तळवणे – कोंडूरा येथे बेकायदा चिरे उत्खनन…

शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला;मनसेची कारवाईची मागणी सावंतवाडी ता.१८-: तळवणे मळेवाड कोडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे)गौण उत्खनन सुरू असून एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्‍याच जागेत चिरे उत्खनन करण्यात आले आहे. सदर दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु आहे. मुळात प्रत्यक्षात असलेल्या चिरे खाणीपैकी बरेच खाणी या…

Read More

आंबोलीतील दुरावस्त तलाठी कार्यालयाच्या उदघाटनाचा घाट…

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा; ग्रामस्थांची मागणी.. आंबोली,ता.१८: येथील तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र दुरवस्था झालेल्या इमारतीचे उदघाटन करण्याचा घाट घातला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च घालून इमारत बांधकाम केली मात्र सध्या अशीच इमारत उदघाटन करून लोकांच्या माथी मारण्याचे प्रकार आहेत.त्यामुळे जनतेच्या पैशातून बांधलेले शासकीय कार्यलय अशा प्रकारे लोकानी का स्वीकारावे असा सवाल उपस्थित होत…

Read More

पुरग्रस्तांची नुकसान भरपाई तात्काळ द्या…

शिवसेना व वंचित कडून तहसीलदारांना निवेदन बांदा/प्रतिनिधीजुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात बांदा व आसपासच्या गावातील ग्रामस्थांचे व दुकानदारांचे झालेले नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसून ती तात्काळ देण्यात यावी यासाठी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुका प्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे,…

Read More

कणकवली शहर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

समीर नलावडे,बंडू हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी घेतली प्रशासकांची भेट ⚡कणकवली ता.१८-: कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायतचा प्रशासकचा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे देण्यात आला आहे. कणकवली शहराचा कार्यभार आता प्रशासक म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यामार्फत केला जाणार असून, कणकवली चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची येत्या काही काळात पदोन्नतीने बदली…

Read More

जागतिक पातळीवर विचार करा आणि स्थानिक पातळीवर कृती करा

डॉ. संभाजी शिंदे;जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनार ⚡कणकवली ता.१८-: शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भूगोल विभागप्रमुख प्रा. संभाजी शिंदे यांनी मांडले. जी-20 अंतर्गत कणकवली महाविद्यालयातील भूगोल विभाग, आजीवन…

Read More

अन्यथा वयाची ७० री पार केलेले सेवानिवृत्त शिक्षक पंचनाद निषेध आंदोलन करणार

⚡कणवकली ता.१८-: मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून २१/०६/२०२२ रोजी ८५ सेवानिवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक‍ व केंद्रप्रमुख यांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. त्याला आता १० महिन्यांचा कालावधी उलटला तरी एकाही शिक्षकाला प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत अंतिम सुधारित निवृत्ती वेतन आदेश निघालेला नाही.एकूण ९४ शिक्षकांना अद्यापही लाभ मंजूर करण्यात येत नसल्याने २५/०५/२०२३ अखेरपर्यंत सर्व पात्र शिक्षकांचे…

Read More

ग्रंथालयांचे उपक्रम जनतेपर्यंत पोहचवा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे : मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा ⚡मालवण ता.१७-: ग्रंथालय ही दोन चाकी गाडी असून कर्मचारी व संस्था पदाधिकारी हे त्याचे महत्वाचे घटक आहेत. सध्याच्या काळात होणारे विविध नवीन बदल ग्रंथालयांनी स्वीकारून प्रवाहात येणे अपरिहार्य बनले आहे. वाचक आणि त्यांची आवड बदलत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी सामाजिक माध्यमांचा वापर करीत…

Read More

श्रीकांत सांबारी यांनी अष्टपैलू कामगिरी करत आचरे गावाचा नावलौकिक वाढवीला

स्वर्गीय श्रीकांत सांबारी यांच्या शोकसभेत अनेकांनी व्यक्त केले विचार ⚡मालवण ता.१७-: आचरे गाव आणि श्रीकांत सांबारी यांचे अतूट असे नाते होते. आदर्श पिता आणि आदर्श नागरिक असे व्यक्तिमत्व लाभलेल्या अजातशत्रू श्रीकांत सांबारी यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवितानाच आचरे गावाचा नावलौकिक वाढवीला. श्रीकांत सांबारी ही व्यक्ती नव्हती तर ती एक संस्था…

Read More

मालवणातील वीज पुरवठा पावसाळ्यापूर्वी सुरळीत करा

हरी खोबरेकर यांची मागणी : कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास ⚡मालवण ता.१७-: मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकांचे आर्थिक नुकसान होत असून पावसाळ्यापूर्वी हा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

Read More

पत्रकार व कुटुंबीय नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद

पत्रकार संघासह विविध संस्थांनी केले होते आयोजन ⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी 17 मे रोजी सावंतवाडी भटवाडी…

Read More
You cannot copy content of this page