आंबोलीतील दुरावस्त तलाठी कार्यालयाच्या उदघाटनाचा घाट…

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा; ग्रामस्थांची मागणी..

आंबोली,ता.१८: येथील तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र दुरवस्था झालेल्या इमारतीचे उदघाटन करण्याचा घाट घातला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च घालून इमारत बांधकाम केली मात्र सध्या अशीच इमारत उदघाटन करून लोकांच्या माथी मारण्याचे प्रकार आहेत.त्यामुळे जनतेच्या पैशातून बांधलेले शासकीय कार्यलय अशा प्रकारे लोकानी का स्वीकारावे असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनाने याकडे लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी आणि पावसाळ्यापूर्वी तलाठी कार्यलय येथील लोकांना उपलब्द करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आंबोलीत सध्या तलाठी कार्यालय हे अल्प बचत भवन येथे दुरावस्था झालेल्या गळक्या इमारतीत आहे त्याठिकाणी लाईट नाही.आंबोली बसस्थानक समोर बांधण्यात आलेले तलाठी कार्यालय ४ वर्षे झाली तरी अद्याप सुरू झालेले नाही.ग्रामपंचायत पोटनिवडणूक झाली की तात्काळ उदघाटन करावे अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या शासकीय तलाठी कार्यालयाचे उदघाटन करायचे आहे त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झालेले आहेत.बांधकाम विभागाने ही इमारत उदघाटन करत असताना सुशोभित करणे रंगकाम करणे आवश्यक आहे..या पूर्वी जो रंग काढला तो खराब झाला आहे.आतील सुविधा तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता चांगला करणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा जुनाट दिसणाऱ्या इमारतीचे उदघाटन करताना शासकीय प्रोटोकॉल पाहणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी.सध्या इमारत नसल्याने विदयार्थी तसेच लोकांची गैरसोय होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इमारत उदघाटन करण्याआधी सुस्थितीत रंगरंगोटी करूनच जनतेसाठी शासकीय कार्यालय लोकार्पण करणे आवश्यक आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यासंबंधी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page