हरी खोबरेकर यांची मागणी : कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास
⚡मालवण ता.१७-: मालवण शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकांचे आर्थिक नुकसान होत असून पावसाळ्यापूर्वी हा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री खोबरेकर यानी निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहरामध्ये कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिक यांना नाहक त्रास होत आहे. मालवण शहर वायरी, तारकर्ली देवबाग या ठिकाणी पर्यटन वाढत आहे. येथील व्यावसायिक यांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्याप्रकारे सुविधा देता येत नसून पर्यटकातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होते. तसेच एसी, फॅन, अन्य विजेची उपकरणे जळून खाक होतात. तरी आपण शहरातील ग्रामीण भागातील आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करून पावसाळ्यापूर्वी वीज पुरवठा सुस्थितीत करावा, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.
