राज्य कलाध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी टोपीवाला हायस्कुलचे बलराम सामंत
⚡मालवण ता.२३-: मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक बलराम गोविंद सामंत यांची राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य राज्य कार्यकारिणी पदाधिकारी निवडही बिनविरोध झाली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- राज्य अध्यक्ष- नरेंद्र बारई, सरचिटणीस-दिगंबर बेंडाळे, कोषाध्यक्ष- विजयसिंह ठाकुर, सहसरचिटणीस-प्रकाश पाटील. आपण दिलेली संधी ही केवळ पद…
