विनयभंग करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा करा

बांदा पोलिसांना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे निवेदन

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यातील एक मुलीला त्यांच्याच गावातील युवकाने विनयभंग करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार श्री तेली यांना देण्यात आले.

यावेळी अर्चना घारे म्हणाल्या की , “देशातील सर्वात प्रगत व विकसनशील असणाऱ्या आपल्या राज्यात, आपल्या भगिनी सुरक्षित नसतील तर इथे असणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होत आहे. विनय भंग करून अत्यंत क्रूरपणे सदर पिडीतेचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची मानसिकता या समाजासाठी अत्यंत घातक असून अश्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, सदर गुन्हेगारास लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा व पीडित युवतीस न्याय मिळवून द्यावा. “

यावेळी सौ.अर्चना घारे, पुंडलिक दळवी , अॅड सायली दुभाषी , दर्शना बाबर देसाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते .

You cannot copy content of this page