⚡मालवण ता.२३-: पंढरपूर येथे दि. २६ ते २८ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याची श्रेया समीर चांदरकर हिला अक्षरगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्रेया ही मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची नववीची विद्यार्थीनी आहे. तिने विविध रंगीत धाग्यांपासून बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची दखल सोशल मीडिया व विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. देशभरातून तिच्यावर राज्यासह कौतुकाचा वर्षाव झाला. आतापर्यंत श्रेयाने विविध माध्यमातून अनेक कलाकृती साकार करून विविध पारितोषिके मिळविली आहेत.
राज्यस्तरीय अक्षर संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या या कलाकृतीची दखल घेत पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात अक्षरगौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
