⚡मालवण ता.२३-: मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक बलराम गोविंद सामंत यांची राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य राज्य कार्यकारिणी पदाधिकारी निवडही बिनविरोध झाली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- राज्य अध्यक्ष- नरेंद्र बारई, सरचिटणीस-दिगंबर बेंडाळे, कोषाध्यक्ष- विजयसिंह ठाकुर, सहसरचिटणीस-प्रकाश पाटील. आपण दिलेली संधी ही केवळ पद नसून, जबाबदारी आहे, याचे भान ठेवून आम्ही आगामी काळात कार्यरत राहू कलाशिक्षकांच्या न्याय्यहक्कांची जपणूक करण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अध्यक्ष बारई यांनी स्पष्ट केले.
उपाध्यक्षपदी निवड झालेल्या बलराम सामंत यांनी सलग ३२ वर्षे कला क्षेत्रात वाहून घेऊन काम केले आहे. त्यांनी समूहाने आणि वैयक्तिक निसर्गचित्र प्रदर्शन भरविले आहे. नाटकांच्या ड्रेपरी बनविल्या आहेतं. राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धेत प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर त्यांनी केला आहे. दशावतार लोककलेच्या १९९६ च्या प्रशिक्षणात समन्वयक म्हणून काम केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे जाऊन ग्रेड परीक्षांचे पेपर तपासणारे जिल्ह्यातील एकमेव कलाशिक्षक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. रेखाकला परीक्षेचे परीक्षक, समालोचक म्हणून काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
