हाॅकर्स संघटना कोणालाही मॅनेज होत नाही;केवळ नाईलाजास्तव नवी जागा स्विकारली…

पालिका प्रशासनाकडून धमकी: पदाधिकाऱ्यांकडून आरोप

⚡सावंतवाडी ता.२३-: गोडाऊन परिसरातील आठवडा बाजाराची जागा केवळ नाईलाजास्तव स्विकारली कारण होळीच्या खुंटापेक्षा ही जागा सर्वासाठी सोईची वाटली मात्र पालिका प्रशासन मंत्री केसरकर यांच्या पुर्ण दबावाखाली वावरत असून बाजार न हलविल्यास पोलिसांची भीती व मारहाणीची धमकी दिल्याने आम्ही फुटपाथवरील जागा सोडली अशा खळबळजनक आरोप आज येथे हाॅकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

तर आम्ही कोणाच्याही दबावाखाली आलो नाही कींवा कोणालाही मॅनेज झालो नाही. तलावाकाठचीच जागा बाजारासाठी योग्य असून तेथे बाजार कोण बसवित असेल आम्ही आजही आम्ही तयार आहोत मात्र तुमच्या राजकारणात आम्हाला खेळवू नका, तुमचे हेवेदावे तुम्ही पाहा फेरीवाल्यांचे हीत हेच आमचे हित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हाॅकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज तेथे आठवडा पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महेश परळकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष अजय जाधव, नाझीन पटेल,महेश बेळगावकर आलिफ खान बाबासाहेब दर्गावाले राजू लेंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page