Headlines

मालवणात आज अचानक पाणी गायब

नागरिक, होम स्टे धारकांची झाली गैरसोय मालवण दि प्रतिनिधीमालवण नगरपालिकेमार्फत धामापूर नळपाणी योजनेद्वारे मालवणात होणारा पाणीपुरवठा सध्या एक दिवस आड होत असताना आज अचानक हा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबत नगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने आयत्या वेळी पाणी साठा संपल्याने नागरिक तसेच होमस्टे धारकांना पाण्यासाठी धावपळ…

Read More

मैत्री ८९ ग्रुपचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कार्मिस आलमेडा यांचा करण्यात आला सत्कार वेंगुर्ले ता.२८-:वेंगुर्ला तालुक्यातील मैत्री 89 ह्या ग्रुप चा स्नेह मेळावा नुकताच वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे पार पडला. हा ग्रुप क्रीडा, सौस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात देखील काम करत असतो. ह्या स्नेह मेळाव्यात उभादांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस आलमेडा वेळ प्रसंगी धावून येणारे, शासनाच्या योजना गोरगरीब पर्यंत पोचवीणारे आणि…

Read More

जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती उपक्रमाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन…

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना होणार तृणधान्य बियाण्यांचे वाटप ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्या सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी…

Read More

पाडलोस अपघातात तळवणेतील तरुण जखमी

एसटी बस व दुचाकीत अपघात : अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविले ⚡बांदा ता.२८-: पाडलोस येथे कालवा पुलाजवळ आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेंगुर्ले-पाडलोस-बांदा एसटी व दुचाकीत भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी उसळली व एसटीला आदळली असे स्थानिकांनी सांगितले. अपघातात दुचकीस्वार सावळाराम सूर्यकांत घाटये (वय 36, रा. तळवणे) याच्या उजव्या पायाला…

Read More

शासकीय निधीची वाट न पाहता रस्त्याची दुरुस्ती

गावडेशेत ते वाघाचा होंडा रस्त्यासाठी केली लोकवर्गणी गोळा:चराठा उपसरपंच अमित परब, महेश पांचाळ यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी शहर गावेडेशेत चराठा हद्दी पासून ते वाघाचा होंडा हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणारा रस्ता आहे. नीधी उपलब्ध नसल्याने दुरुस्ती अभावी हा रस्ता वाहतूकीसाठी फार धोकादायक झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून देखील डागडुजी करण्याकरीता…

Read More

भाजपातर्फे विशेष जनसंफ अभियान ३० मे पासून

⚡वेंगुर्ला ता.२८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ३० मे ते ३० जून या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष जनसंफ अभियान होणार आहे. जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र व बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना…

Read More

ठाकरे सेनेला सहकारात आमदार नितेश राणे यांनी दिला झटका

जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजपमध्ये ⚡कणकवली ता.२८-: उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येथील आत्माराम बालम यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोराचा झटका दिला आहे. या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर…

Read More

खारेपाटणमध्ये जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स् छोटे चॅम्पियन्स स्पर्धा

⚡कणकवली ता.२८-: कणकवली तालुक्यात खारेपाटण गावात प्रथमच श्री.फोंडकणदेवी स्पोर्टस् ॲकॅडमी निरोम वतीने सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने माधुरी वसंत सप्रे (आदर्श क्रीडा शिक्षीका) यांच्या स्मरणार्थ “जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स् (मैदानी) छोटे चॅम्पियन्स स्पर्धा ३ व ४ जुन २०२३ रोजी खारेपाटण हायस्कुल व ज्यु.कॉलेज मैदान, खारेपाटण येथे वयोगट ६,८,१०,१२,१४,१६,१८ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली…

Read More

कणकवली येथे फलाहारी महाराज आश्रम वास्तूशांती व कलशारोहण सोहळा

⚡कणकवली ता.२८-: कणकवली शहरातील प. पू. फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमाचा (श्रीराम मंदिर ) वास्तूशांती व कलशारोहण सोहळा गुरुवार १ जूनला होणार आहे. यानिमित्त ३१ मे व १ जून रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार ३१ मे रोजी सकाळी ८ वा. श्री रामप्रभूंवरती अभिषेक, प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, सायं….

Read More

भोसले पॉलिटेक्निकच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये यशस्वी निवड…

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते. पुण्याजवळील आकुर्डी येथील उत्पादन प्रकल्पासाठी ही निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले…

Read More
You cannot copy content of this page