शासकीय निधीची वाट न पाहता रस्त्याची दुरुस्ती

गावडेशेत ते वाघाचा होंडा रस्त्यासाठी केली लोकवर्गणी गोळा:चराठा उपसरपंच अमित परब, महेश पांचाळ यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी शहर गावेडेशेत चराठा हद्दी पासून ते वाघाचा होंडा हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणारा रस्ता आहे. नीधी उपलब्ध नसल्याने दुरुस्ती अभावी हा रस्ता वाहतूकीसाठी फार धोकादायक झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून देखील डागडुजी करण्याकरीता नीधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे गावेडेशेत चराठयातील रहिवाशांनी लोकवर्गणीतून रस्त्याची डागडुजीच्या कामाची सुरवात केली आहे, अशी माहीती चराठा उपसरपंच अमित परब व महेश पांचाळ यानी दीली आहे.

You cannot copy content of this page