कार्मिस आलमेडा यांचा करण्यात आला सत्कार
वेंगुर्ले ता.२८-:वेंगुर्ला तालुक्यातील मैत्री 89 ह्या ग्रुप चा स्नेह मेळावा नुकताच वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे पार पडला. हा ग्रुप क्रीडा, सौस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात देखील काम करत असतो. ह्या स्नेह मेळाव्यात उभादांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस आलमेडा वेळ प्रसंगी धावून येणारे, शासनाच्या योजना गोरगरीब पर्यंत पोचवीणारे आणि गेली 18 वर्षे स्वतःफुढाकार घेऊन रक्त दान शिबीर आयोजित करणारे कोरोना काळात देखील मोठे योगदान देऊन कित्येक लोकांचे प्राण वाचविले होते.
या संपूर्ण योगदानबद्दल त्यांचा कित्येक संघटनानी, सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्थानी सत्कार केला असून मैत्री 89 ग्रुप च्या वतीने शाल श्रीफळ बुफे तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला…… यावेळी 89 ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते…..
