हडी येथील वृक्षतोड विरोधात अद्यापही कारवाई नाही..

मयूर करंगुटकर यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा..

⚡मालवण ता.२८-:
हडी ग्रामपंचायत हडी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीची उत्पन्न देणारी आंबा झाडे व कलमे तोडीविरोधात उपोषण केल्यावर चार महिने उलटले तरी गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई झालेली नसल्याने हडी येथील ग्रामस्थ मयूर करंगुटकर यांनी पुन्हा एकदा उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

हडी ग्रामपंचायत हडी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीची उत्पन्न देणारी आंबा झाडे व कलमे तोडीविरोधात गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची व ग्रामपंचायतीच्या इतर कारभाराची पंधरा दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन लेखी दिले होते. तसेच याबाबत महसूलची पंचयादी करून घेण्यात येईल, असेही सांगितले होते. तर या प्रकरणी मालवण पोलिस ठाणे मालवण यांनी सुद्धा चौकशी करून कारवाई करू असे सांगितले होते. त्यामुळे करंगुटकर यांनी उपोषण स्थगित केले होते. परंतु या आश्वासनांना चार महिने होऊन गेले तरी देखील गटविकास अधिकारी यांनी अजून कोणतीही चौकशी किंवा कारवाई केली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसात या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई न झाल्यास स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे मयुर करंगुटकर यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, मालवण तहसीलदार, मालवण पोलिस ठाणे यांना कळविले आहे.

You cannot copy content of this page