वेंगुर्ला नवनिर्वाचित नगरसेविका समिधा रेडकर यांचा “बालकांच्या आनंदासाठी ” वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.२८-: बालकांच्या वर्गखोलीसाठी अंगणवाडी वेंगुर्ले नंबर ४ मध्ये रंगकाम करण्यात आले आहे. आनंद रेडकर यांनी केलेल्या रंगकामामुळे वर्गखोली आकर्षक, स्वच्छ आणि रंगीबेरंगी बनली आहे. यासाठी लागणारी आर्थिक मदत नवनिर्वाचित वेंगुर्ला नगरसेविका समिधा रेडकर व हॉटेल व्यावसायिक आनंद रेडकर यांनी केली.
त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी येथे आज शनिवारी समिधा रेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांस नगरसेविका समिधा रेडकर, काथ्या उद्योजिका प्रज्ञा परब, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक उमेश येरम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हर्षद परब, ऍड. श्रद्धा परब -बाविसकर, श्री. मठकर, मुख्याध्यापक संतोष परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे तसेच इतर अंगणवाडी सेविका स्मिता कोणेकर, राधा बागवे, सुनिता कांबळे, मदतनीस अवनी जाधव आणि पालकवर्ग कार्मेलीन डिसोझा, अन्वी जाधव, सुनंदा धारगळकर, सान्वी जाधव, धामनिया तांडेल आदी उपस्थित होते.
रंगकामामुळे अंगणवाडीची वर्गखोली बालकांसाठी अधिक आनंददायी व प्रेरणादायी बनली आहे. पालक, शिक्षक आणि समाजसेवक यांच्या सहकार्यामुळे बालकांचे शिक्षण व विकास अधिक सकारात्मक व सर्जनशील होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या सोहळ्याद्वारे समाजातील उदारमतवाद, बालविकासासाठी केलेले योगदान आणि सामुदायिक एकजुटीचे उत्तम उदाहरण अधोरेखित झाले.

You cannot copy content of this page