खारेपाटणमध्ये जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स् छोटे चॅम्पियन्स स्पर्धा

⚡कणकवली ता.२८-: कणकवली तालुक्यात खारेपाटण गावात प्रथमच श्री.फोंडकणदेवी स्पोर्टस् ॲकॅडमी निरोम वतीने सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने माधुरी वसंत सप्रे (आदर्श क्रीडा शिक्षीका) यांच्या स्मरणार्थ “जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स् (मैदानी) छोटे चॅम्पियन्स स्पर्धा ३ व ४ जुन २०२३ रोजी खारेपाटण हायस्कुल व ज्यु.कॉलेज मैदान, खारेपाटण येथे वयोगट ६,८,१०,१२,१४,१६,१८ वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुला-मुलींमध्ये क्रीडा गुणांची आवड निर्माण व्हावी व मोबाईलपासुन दुर रहावे या हेतुने या स्पर्धेचे आयोजन करण्या आले आहे.या स्पर्धेकरीता शाळा ,कॉलेज,मंडळ, ग्रामस्थ मंडळ व गावातील मुला-मुलींनी सहभाग घ्यावा. स्पर्धे करीता नोंदणीसाठी अंतीम तारीख १जुन २०२३ आहे.स्पर्धा शुल्क रु.२००/- प्रती क्रीडा प्रकार या वयोगट ६,८,१०,१२ मुला-मलीं करीता व रु.३००/- प्रती क्रीडा प्रकार या वयोगट १४,१६,१८ मुला-मलीं करीता.अधिक माहीतीसाठी संपर्क समीर ज.राऊत (७९००१९७४७५) कु.अंजली ज.गायकवाड, कु.प्राची दि.लाड,स.१०.०० ते १२.०० या वेळेत नोंदणी करावी. खारेपाटण येथे कु.रतन चादेलकर -९३०९९४४३०१, कु.साक्षी संतोष जाधव, कु.दिशा ईस्वलकर, कु.रिध्दी संतोष पांचाळ येथे सायं.४ ते ७ या वेळेत नोंदणी करावी.असे आवाहन स्पर्धेचे प्रायोजक सौ.स्पुर्ती विशाल तेंडुलकर व आयोजक संस्थेचे अध्यक्ष व क्रीडा मार्गदर्शक समीर जयवंत राऊत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page