ठाकरे सेनेला सहकारात आमदार नितेश राणे यांनी दिला झटका

जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजपमध्ये

⚡कणकवली ता.२८-: उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येथील आत्माराम बालम यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोराचा झटका दिला आहे.

या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांची संख्या आणखी वाढली आहे.
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशी राणे देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने ,मिलिंद माने आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page