Headlines

फळपिक विमा भरपाईचा मार्ग मोकळा होणार…

वंचित शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा पुढाकार:१० ऑगस्टला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक.. कणकवली : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय…

Read Full News

डोंगर सपाटीकरणामुळे कारिवडे-भेंवकवाडीतील घरांना धोका…

संबंधितांवर त्वरित कारवाई करा: माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी: तहसीलदारांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी, ता. ६-: कारिवडे-भेंवकवाडी परिसरातील डोंगर जमिनीचे सपाटीकरण करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आल्याने परिसरातील घरे, शेती, विहिरी व कंपाऊंड भिंतींचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदार यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.याबाबत माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांच्या…

Read Full News

‘नारळ लढवणे’ला अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा द्या

मंत्री आशिष शेलार यांच्याकडे रविकिरण तोरसकर यांची मागणी कुडाळ : कोकणातील नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘नारळ लढवणे’ या पारंपरिक प्रकाराला महाराष्ट्र शासनाने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल…

Read Full News

डिंगणे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील महादेव सावंत (वय ४५) यांचा गोव्यातील माशेल येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ६) सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.महादेव सावंत हे दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यात नेहमीप्रमाणे कामावर जात असताना समोरून येणाऱ्या कॅम्पर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर…

Read Full News

शिवसेना पुरस्कृत एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर

मोपा व चिपी विमानतळाची जबाबदारी.. ⚡कुडाळ ता.०६-: शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या सर्वसाधारण सभेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते काका कुडाळकर यांची युनियनच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच चिपी विमानतळ येथील युनियनची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ‘द हिल्टन’ हॉटेलमध्ये…

Read Full News

शिरोडा येथे मच्छीमाराचाखाडीपात्राच्या खोल पाण्यात पडून मृत्यू

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा खालची केरवाडी येथील मच्छिमार हिरोचन लक्ष्मण चोपडेकर( वय 50)हे साईबा मंदिर समोरिल केरवाडी खाडीमध्ये पारंपरिक मच्छिमारी करीत असताना खाडीच्या पाण्यात तोल जाऊन खाडीपात्राच्या खोल पाण्यात पडून मृत्यू झाला.याबाबत त्यांचे भाऊबाळकृष्ण लक्ष्मण चोपडेकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात खबर दिली आहे. ही घटना बुधवार 5 ऑगस्ट रोजी 5:30 ते 6:30 वा.या मुदतीत घडली. याप्रकरणी वेंगुर्ला…

Read Full News

सावंतवाडीत नवे पार्किंग धोरण लागू…

उघड्यावर चारचाकींना बंदी, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना.. ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि आगामी १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरात नवे पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहरातील प्रमुख नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व व्यापारी संघटनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या…

Read Full News

आंबोलीतील धोकादायक पर्यटनस्थळांवर सुरक्षा रक्षक नेमा…

अनिल चव्हाण यांची मागणी:पोलिसांकडे निवेदन सादर.. ⚡आंबोली, ता.५-: पर्यटन स्थळावरील सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी येथील पत्रकार अनिल चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. आंबोली पर्यटन स्थळावर पर्यटक अपघात घडण्याचे प्रकार बऱ्याचदा घडतात. बऱ्याचवेळा आणखी अनुचित प्रकार होतात. कुटुंबिक पर्यटक तसेच कपल तसेच पर्यटक यांना सुरक्षा वाटावी.यासाठी पोलिसांनी सरकारी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता आहे….

Read Full News

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्यामार्फत आसोलीतील 5 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡वेंगुर्ला ता.०५-: मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या हस्ते आसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १, श्री देव नारायण मंदिर शाळा, फणसखोल, सक्राळ, जोसोली प्राथमिक शाळा आणि बापुलिवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आणि लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील मुलांनाही पेन व वह्या वाटप करण्यात आले….

Read Full News

उभादांडा केपादेवी शाळेला जि.प. सदस्य संजय गावडे यांच्याकडून वॉटर प्युरिफायर व शालेय साहित्य

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलउभादांडा केपादेवी जिल्हा परिषद शाळेला उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांनी वॉटर प्युरिफायर प्रदान करून तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शुद्ध व आरोग्यदायी पाणी मिळावे या उद्देशाने देण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन फीत कापून केपादेवी देवस्थानचे मानकरी विष्णू उर्फ बाळू गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संजय…

Read Full News

You cannot copy content of this page