बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील महादेव सावंत (वय ४५) यांचा गोव्यातील माशेल येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ६) सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
महादेव सावंत हे दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यात नेहमीप्रमाणे कामावर जात असताना समोरून येणाऱ्या कॅम्पर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी कॅम्पर वाहनातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
महादेव सावंत यांच्या निधनाने डिंगणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
डिंगणे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू
