Headlines

जलसंधारण सप्ताह अंतर्गत 21 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ’महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन

उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जिमाका) : शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे पोलीस परेड ग्राऊड येथून आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत…

Read Full News

दांडी येथे वीज वाहिन्या तुटून पाडण्याच्या घटनांमुळे नागरिक आक्रमक

मालवण (प्रतिनिधी) मालवण दांडी येथील झालझुल वाडीतील वीज पोलावरील वीज वाहिन्या तुटून पडल्याने एक युवक बालबाल बचावल्याची घटना आज सायंकाळी घडली. या भागात वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून त्याबाबत वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने दांडी येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून उद्या १४ रोजी वीज कार्यालयावर धडक…

Read Full News

अंबाजी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

लायन्स क्लब ऑफ मालवणचा शैक्षणिक उपक्रम मालवण | प्रतिनिधी :लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने वायरी-मालवण येथील अंबाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना मिळाला. लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले…

Read Full News

कवी रुजारीओ पिंटो यांच्या ‘माँ मेरी’ हिंदी कवितासंग्रहाचे १५ ऑगस्टला मालवणात प्रकाशन…

मालवण दि प्रतिनिधी स्वांतत्र्यदिनाच्या औचित्य साधून कोकणातील सुप्रसिद्ध कवी रुजारीओ पिंटो यांच्या ‘माँ मेरी’ या पहिल्यावहिल्या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण-कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० वाजता पार पडणार असून, तमाम काव्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले….

Read Full News

कणकवलीत १.७९८ किलो गांजासह दोघे ताब्यात…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.. कणकवली : गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १.७९८ किलो गांजा तसेच दोन दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. कणकवली पोलीस ठाणे…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ…

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन:माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा ⚡सावंतवाडी ता.१३-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे…

Read Full News

मालवणात टोपीवाला हायस्कुलने काढली तिरंगा रॅली

मालवण : (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाच्या मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’, ‘देश प्रथम’ आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात…

Read Full News

घोषणांनी दणाणला कट्टा परिसर; वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

मालवण दि प्रतिनिधी “वंदे मातरम्!”, “भारत माता की जय!”, “जय जवान, जय किसान!”, “भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!” अशा आसमंत दणाणून सोडणाऱ्या देशभक्तीपर घोषणांनी कट्टा परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथून प्रभात…

Read Full News

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा १५ ऑगस्ट रोजी शुभारंभ

मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA), कोकण विभागीय कार्यालयाच्या वतीने ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आचरे-कुडाळ येथील हॉटेल आराध्या, झाराप झिरे पॉईंट, झाराप-पत्रादेवी महामार्ग येथे करण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व…

Read Full News

स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी मालवणात देशभक्तीपर गीत गायन व निबंध स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधीस्वातंत्र्य दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या निमित्ताने समूह साधन केंद्र, मालवण यांच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत तालुकास्तरा वरील विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी तसेच…

Read Full News

You cannot copy content of this page