Headlines

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा १५ ऑगस्ट रोजी शुभारंभ

मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA), कोकण विभागीय कार्यालयाच्या वतीने ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आचरे-कुडाळ येथील हॉटेल आराध्या, झाराप झिरे पॉईंट, झाराप-पत्रादेवी महामार्ग येथे करण्यात येणार आहे.

या अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जि प अध्यक्ष प्रमोद कामत, मासिया ट्रस्ट अध्यक्ष आशिष पेडणेकर, मासीयाचे वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, युनियन बँक क्षेत्रीय प्रबंधक बी एस राघवेंद्र तसेच विविध औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायाच्या संधी निर्माण करणे, उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

‘स्वप्न सिंधुदुर्गाचे, संकल्प उद्योगांचे’ या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानामुळे सिंधुदुर्गातील नवउद्योजकांना आणि स्थानिक व्यावसायिकांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यां कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मासियाचे कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ दीपक परब आणि विद्यमान उपाध्यक्ष संतोष राणे यांनी केले आहे

You cannot copy content of this page