Headlines

स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी मालवणात देशभक्तीपर गीत गायन व निबंध स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिन आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या निमित्ताने समूह साधन केंद्र, मालवण यांच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत तालुकास्तरा वरील विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत देशभक्तीपर गीत गायन तसेच निबंध लेखन अशा दोन प्रकारांत विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधितांनी उपस्थित राहून स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन समूह साधन केंद्र, मालवणचे केंद्रप्रमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page