Headlines

रेडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम…

⚡वेंगुर्ले ता.२५-: ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी रेडी ( ता.वेंगुर्ले) ग्रामपंचायत ने एक आदर्शवत पाऊल उचलले असून,रेडी सरपंच , उपसरपंच,सदस्य, आजी – माजी लोकप्रतिनिधी , तंटा मुक्त अध्यक्ष यांच्या वतीने रेडी येथील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत,त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाची घरपट्टी सर्वस्वी ग्रामपंचायत ,लोकप्रतिंधी भरणार असून…

Read More

विध्यार्थ्यानी संस्कार आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधावा…

ऍड. संग्राम देसाई :एसआरएम कॉलेजचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा :मान्यवरांनी जागविल्या महाविद्यालय उभारणीच्या आठवणी.. कुडाळ : आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संग्राम देसाई यांनी केलं….

Read More

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट…

कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संदीप मेस्त्री, बंडू हर्णे, संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरु वर्देकर, नगरसेवक…

Read More

एसटी मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा…

नगरसेविका मोहिनी मडगावकर: नगरपरिषद अधिकाऱ्यांना दाखवली रस्त्याची दुरवस्था,खड्डे तत्काळ बुजवण्याचे दिले निर्देश.. ⚡सावंतवाडी ता.२५-: शहरातील एसटी जाण्याच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही महिला घसरून पडल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभापती मोहिनी मडगावकर यांनी तातडीने नगरपरिषद अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून रस्त्याची पाहणी करून…

Read More

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग…

इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी…. ⚡सावंतवाडी ता.२५-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सहा महिन्यांचा विशेष ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे._…

Read More

पाट हायस्कूल मध्ये हरित सेने मार्फत सीडबॉल बनवण्याचा उपक्रम…

⚡कुडाळ ता.२४-: पाट हायस्कूल हरित सेने मार्फत विद्यालयात विविध पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातात. याचबरोबर पर्यावरण विषयक दिनविशेष साजरे केले जातात. यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत बियांचे संकलन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गोळा केलेल्या बिया त्यांच्यापासून सीडबॉल बनवण्याचा उपक्रम विद्यालयात घेण्यात आला.फणस, आंबा, जांभळ, इतर जातीचे बियांचे संकलन…

Read More

गणेश चतुर्थीपर्यंत गणेश घाटाचे काम पूर्ण होणार…

नगरसेविका नयना मांजरेकर यांची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.२४-: भंगसाळ नदी किनारी गणेश घाट बांधणे हे काम मुळात योजलेल्या व योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे कामाबाबत अल्टीमेटम अथवा इशारा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. नगराध्यक्ष व कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने येत्या गणेश चतुर्थीमध्ये गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल याची खात्री नगरसेविका नयना मांजरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More

मालवणात आल्यावर प्रेरणा व प्रोत्साहन मिळते…

नारायण राणे:कार्यकर्त्यांनी अभ्यासू वृत्ती जोपासावी… ⚡मालवण ता.२४-: “राजकारणात आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे भूषवली, मात्र माझ्यात कोणताही बदल झालेला नाही. मी आजही सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा सेवक आहे. कार्यकर्त्यांनी पदाचा गर्व न बाळगता अभ्यासपूर्वक काम करत जनतेची सेवा करावी,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी…

Read More

सावंतवाडीत तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले…

क्रेटा कार व शेडचे नुकसान, मोठा अनर्थ टळला.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरातील खासकीलवाडा तहसीलदार निवासस्थानाजवळ झाड कोसळले. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यात कारचे नुकसान झाले आहे. आज सायंकाळी पावसानं जोर धरला होता. यावेळी तहसीलदार निवासस्थानाजवळी हे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणाला हानी झाली नसली तरी येथे पार्क केलेली क्रेटा…

Read More

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसडक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव…

बांधकाम समिती सभेत ठराव; नादुरुस्त रस्ते, शाळांची स्थिती आणि पुलाच्या भरावावरून सदस्यांची नाराजी.. सिंधुदुर्गनगरी ता २४दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडकचे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा. असा ठराव आजच्या बांधकाम समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत,…

Read More
You cannot copy content of this page