Headlines

धीरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी धीरेंद्र म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांनी २१ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी म्हापसेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष महेश पारकर यांनी धीरेंद्र म्हापसेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. म्हापसेकर यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी शहरातील ओबीसी मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page