७० हून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; औषधांचे मोफत वाटप…
⚡वैभववाडी ता.२१-: ग्रामपंचायत नावळे यांच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, एस पी एम मेडिकल कॉलेज व प्राथमिक आरोग्य केंद्र वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय नावे येथे महिला आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात ७० गुण अधिक महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी गुरव डॉ ऋतुजा मासे, डॉ अनिरुद्ध मुद्राळे डॉ प्राची जाधव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्योत्स्ना पाटील आरोग्य सेविका नीलम टाकळे तुषार शिंगाडे अशा सेविका साक्षी शेळके सुप्रिया सुतार, सीआरपी शर्वरी रावराणे,अंगणवाडी सेविका माधवी नरम सुमिता इंदप नीलम रावराणे शाळेतील शिक्षक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये औषध गोळ्या ही मोफत देण्यात आल्या.
