Headlines

साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या…

प्रमोद रावराणेंची पालकमंत्र्यांकडे मागणी..

वैभववाडी प्रतिनिधी
‌कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाात येथील स्थानिक दळणवळण व रहदारीच्या दृष्टीने साकव कामांची अत्यंत निकडीची गरज असून गेली अनेक वर्षे साकवांची नव्याने मागणी असलेल्या आणि देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्य सर्व साकवांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून मिळवा अशी मागणी जि प सदस्य प्रमोद रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मौजे वेंगसर घाडीवाडी गांगेश्वर मंदिरानजिक साकव ,नानिवडे कुरणवाडी वाणीवाडी निवळाच्या वहळावर साकव बांधणे,
तिरवडे तर्फ सौदल होळीचा मांड रहाटकोंडवाडी मार्गावर साकव बांधणे, मांगवली भट्टवाडी जि. प. शाळा मार्गावरील साकव दुरुस्ती करणे,मोंदे बावचादेवी मंदिरानजिक साकव बांधणे, दिग्शी पाष्टेवाडी श्री गांगेश्वर मंदिर मार्गावर साकव बांधणे, ऐनारी गांगेश्वर मंदिर नजिक साकव बांधणे, भुईबावडा पहिलीवाडी श्री. तुकाराम प्रभु यांच्या घरानजिक मार्गावर साकव बांधणे, जांभवडे पालांडेवाडी येथील साकव दुरुस्ती करणे, जांभवडे कोकरेवाडी येथे साकव बांधणे, कोळपे जमातवाडी जांभळखिंड मार्गावर साकव बांधणे, हेत राववाडी खडकवाडी मार्गावर साकव बांधणे, वेंगसर काळेश्र्वरी मंदिरानजिकचा साकव दुरुस्त करणे, ऐनारी गडगेवाडी येथे साकव बांधणे, आखवणे- गुरववाडी भोम मार्गावर तेळसाचा गोवंड येथे साकव बांधणे, आधी कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी निवेदनातृत्वारे जिप सदस्य प्रमोद राव यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page