Headlines

प्रमोद जठार यांनी या आरमार सृष्टी प्रकल्पासाठी अथक मेहनत…

आमदार नितेश राणे:विजयदुर्गमध्ये “आरमार सृष्टी” या ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न.. देवगड (प्रतिनिधी) प्रमोद जठार यांनी या आरमार सृष्टी प्रकल्पासाठी अथक मेहनत घेतली असून इथे येणारे पर्यटन प्रकल्प स्थानिकांची आर्थिक समृद्धी वाढविण्यात यशस्वी ठरतील.विजयदुर्ग किल्ला ही देवगडची ओळख असून आरमार सृष्टी उभारल्यानंतर वाढलेल्या देशपरदेशातील पर्यटकांना पर्यटन सेवा देताना स्थानिकांनी स्वतःचा रोजगार निर्माण करावा तरच या प्रकल्पाचं…

Read More

जनतेसाठी अहोरात्र काम करणारे युवा नेतृत्व-: विशाल परब…

⚡सावंतवाडी ता.१५-: स्वतःचा कष्टातून कमविलेल्या 100 रुपयातून 70 रुपये जनतेसाठी खर्च करण्याचा ध्यास घेऊन अहोरात्र जनतेची सेवा करणारे आणि अल्पावधीतच आपल नाव अनेकांच्या ह्रुदयात स्थान निर्माण केलेले युवा उद्योजक आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस आज साजरा होत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला हा धावता आढावा. शांत, संयमी नेतृत्व म्हणून…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय लाड यांचे उद्या उपोषण..!

⚡सावंतवाडी ता.१४-: मालवण राजकोट मालवण येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच कोलमडून पडणे ही जिल्ह्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सदर पुतळा उभारणीच्या कामात दुर्लक्षासह भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे ज्या शासकीय यंत्रणेमार्फत पुतळ्याचे काम करण्यात आले. त्या संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी…

Read More

आरमार सृष्टी साकार झाल्यावर विजयदुर्गवासीयांनी आर्थिक रोजगार निर्माण करावा…

आमदार नितेश राणे यांचे आवाहन:विजयदुर्गमध्ये “आरमार सृष्टी” या ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न.. विजयदुर्ग : विजयदुर्ग किल्ला ही देवगडची ओळख असून आरमार सृष्टी उभारल्यानंतर वाढलेल्या देशपरदेशातील पर्यटकांना पर्यटन सेवा देताना स्थानिकांनी स्वतःचा रोजगार निर्माण करावा तरच या प्रकल्पाचं सार्थक होईल, असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी विजयदुर्ग मध्ये केले. विजयदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहावर आरमार सृष्टीचे भूमिपूजन…

Read More

जनहिताच्या कार्यक्रमाने विशाल परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस यंदा जनहितकारी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती देण्यात आली असून, माडखोल प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्बुलन्स वितरण करणे, सावंतवाडी शहरात कचराकुंडी कीटकनाशक मशीन वितरण करणे, वेंगुर्ला नगरपरिषद कचराकुंडी व कीटकनाशक मशीन वितरण, बांदा ग्रामपंचायत ॲम्बुलन्स वितरण कचरा कुंडी व कीटक नाशक मशीन वितरण,…

Read More

वीज पडून चौकुळ येथील महिलेचा मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१४-: चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी सडा येथे वीज पडल्याने द्रौपदी मारुती नाईक (वय ४२ ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. शेतातगुरे चारावयास गेली असताना तिच्या अंगावर अचानक वीजेचा लोळ पडून ती जागीच मयत झाली. या बाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार दत्तात्रय देसाई, मनीष शिंदे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या…

Read More

भाजपच्या मळगाव सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला…

फोडाफोडीचा डाव फसल्याने ठराव दाखल करणारे विरोधकच गैरहजर.. सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या मळगांव ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यावर विरोधकांकडून दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदाना आधीच बारगळला. भाजपच्या काही सदस्यांच्या मनात गैरसमज निर्माण करून देत त्यांना हाताशी धरून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांचा डाव असफल झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी…

Read More

खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाखाचा निधी मंजूर…

आम. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला.. मालवण (प्रतिनिधी) आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामस्थाना दिलेला शब्द पाळला असून खोटले ग्रामपंचायत इमारती साठी जनसुविधा जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल २० लाख रु. निधी मंजूर करून दिला आहे. लवकर प्रशस्त अशी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी उभी राहणार आहे. मालवण तालुक्यातील खोटले येथील ग्रामपंचायत कार्यालय अतिशय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायत…

Read More

चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन…

पालकरवाडी पायवाट, मारुती मंदिर रस्ता, पालकरवाडी-भटवाडी स्मशानभूमी, कोंडवाडी गणेश मंदिर रस्ता या कामांचा समावेश.. मालवण दि प्रतिनिधीचिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात आले. चिंदर पालकरवाडी अनंत आचरेकर घर ते महेश गोलतकर घर पायवाटेचे भूमीपूजन चंद्रशेखर पालकर यांच्या…

Read More

कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचे भान ठेवून काम करा…

ऐश्वर्या काळूशे:पोलीस पाटील सेवा संघ कार्यालयाचे उदघाटन.. कुडाळ : तुमच्या नियुक्त्या मिळविण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला आहे. पण आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ओळखून कामाला लागा असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी नवनियुक्त पोलीस पाटील यांना केले. कुडाळ सांगिर्डेवाडी येथे सुरु केलेल्या पोलीस पाटील सेवा संघाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.नवनियुक्त झालेल्या पोलीस…

Read More
You cannot copy content of this page