खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाखाचा निधी मंजूर…

आम. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला..

मालवण (प्रतिनिधी)

आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामस्थाना दिलेला शब्द पाळला असून खोटले ग्रामपंचायत इमारती साठी जनसुविधा जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल २० लाख रु. निधी मंजूर करून दिला आहे. लवकर प्रशस्त अशी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी उभी राहणार आहे.

मालवण तालुक्यातील खोटले येथील ग्रामपंचायत कार्यालय अतिशय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायत इमारत केंद्र शाळा खोटले येथे तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात आली आहे. मात्र कायमस्वरूपी सुसज्ज ग्रामपंचायत इमारत मिळावी अशी मागणी खोटले ग्रामस्थांची होती. याबाबत खोटले सरपंच सुशिल परब, उद्योजक आशिष परब आणि ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामपंचायती साठी आवश्यक निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आम. नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने सरपंच सुशिल परब, ग्रा.प. सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page