जनतेसाठी अहोरात्र काम करणारे युवा नेतृत्व-: विशाल परब…

⚡सावंतवाडी ता.१५-: स्वतःचा कष्टातून कमविलेल्या 100 रुपयातून 70 रुपये जनतेसाठी खर्च करण्याचा ध्यास घेऊन अहोरात्र जनतेची सेवा करणारे आणि अल्पावधीतच आपल नाव अनेकांच्या ह्रुदयात स्थान निर्माण केलेले युवा उद्योजक आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस आज साजरा होत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला हा धावता आढावा.

शांत, संयमी नेतृत्व म्हणून विशाल परब यांनी सावंतवाडी मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्ष ते आपल्या व्यवसायासह समाजकार्यात आणि राजकारणात उंच भरारी घेत अनेकांना मदतीचा हात देत असतात. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेला ते आपलेसे वाटतात. भारतातील अग्रण्य उद्योगपती स्व. रतनजी टाटा यांचे काहीच दिवसांपूर्वी दुःखद निधन झाल्याने आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असला तरी देखील सावंतवाडी मतदार संघात त्यांना मानणाऱ्या वर्गाकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले असून, युवकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. आज त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जरी साजरा होत नसला तरी सावंतवाडी मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र कडून घेण्यात आलेला हा धावता आढावा.

You cannot copy content of this page