⚡सावंतवाडी ता.१४-: चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी सडा येथे वीज पडल्याने द्रौपदी मारुती नाईक (वय ४२ ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. शेतात
गुरे चारावयास गेली असताना तिच्या अंगावर अचानक वीजेचा लोळ पडून ती जागीच मयत झाली. या बाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार दत्तात्रय देसाई, मनीष शिंदे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
वीज पडून चौकुळ येथील महिलेचा मृत्यू…
