जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ…

जनगणनेत प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका महत्त्वाची:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.०७-: जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व फिल्ड ट्रेनर यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी फिल्ड ट्रेनर यांना दिल्या.जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या प्रयत्नांना यश…

आय.सी.यु कार्यान्वित:फिजिशियन व्ही.एन.रेड्डी हजर.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांचा प्रश्न जटील झालेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ.विशाल उर्फ व्ही.एन.रेड्डी (M.D.फिजिशियन)आज सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीच्या मागणीला यश आले आहे. कृती समितीच्यावतीने आज डॉ. रेड्डी यांचे स्वागत करण्यात आले.डॉ. रेड्डी हजर झाल्याने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यु. युनिट पूर्ण…

Read More

भाजपा स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप…!

⚡सावंतवाडी ता.०७-:भाजपा स्थापना दिन आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता…

Read More

पत्रकार देवयानी वरसकर यांना मातृशोक…

⚡ओरोस ता ७-: मालवण तालुक्यातील वराड येथील श्रीमती शोभा प्रभाकर वरसकर वय ७८ यांचं सोमवारी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार देवयानी वरसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, दीर, वहिनी असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी वराड येथे त्यांच्यावर…

Read More

मतदान नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचे नागरिकांना आवाहन…

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत सूचना.. ⚡कणकवली ता.०७-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवलीचे मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या अस्तित्वात…

Read More

जिल्हा प्रशासनाने गाठली संवेदनशून्यतेची हद्द …

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका.. कुडाळ : सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’ गाठल्याची टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. तळाशील ग्रामस्थांचे जलआंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांसहित जिल्हा प्रशासनातील अधिकारी नाच-गाण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी केली जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला…

Read More

५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी फिजीशीयन…

नागरिकांना मोठा दिलासा: नगरसेवक देवी या सूर्याजी यांनी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांचे मानले आभार.. सावंतवाडी : गेली ५ वर्ष सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजीशीयन मिळावा म्हणून सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन मिळाला आहे. यासाठी रूग्णकल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी…

Read More

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्री 2026 शरीरसौष्ठव स्पर्धा…

विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने आयोजन.. ⚡कणकवली ता.०७-: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा दि. १० एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. सदरची स्पर्धा ५५,…

Read More

मठ व दाभोली सडा येथे आकस्मिक आग लागून काजू नुकसान…

वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या सहकार्याने आग आटोक्यात.. ⚡वेंगुर्ला ता.६-: तालुक्यातील दाभोली सड्यावर (पवनचक्की नजिक) येथे आज सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच माजी जि. प. सदस्य बाबा राऊत, दाभोली माजी सरपंच सुचिता गोलतकर, पोलीसपाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष दाभोलकर, ग्रा. पं. सदस्य…

Read More

हुंबरठ येथे दुचाकीचा अपघात : दोघे गंभीर जखमी…

⚡कणकवली ता.०६-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिरानजीक दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द, ता. कणकवली) व केतन वाडे (वय २८, रा. मुंबई) हे दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीचा वेग जास्त…

Read More
You cannot copy content of this page