कणकवली : देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तहसीलदार रमेश पवार यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कामकाजाचे कौतुक करत प्रशासनातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. तसेच निवृत्तीनंतरच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक करंबेळकर, मंदार सापळे, नायब तहसीलदार दिलीप पाटील, श्री. नागावकर, नायब तहसीलदार श्री. खरात आदी उपस्थित होते.
