आडाळी एमआयडीसीतील अवैध उत्खनन व माती चोरीप्रकरणी दीपक केसरकर यांचा मोठा हात; त्यांची चौकशी लावा…

रुपेश राऊळ : चौकशी न झाल्यास जनआंदोलन उभारणार; निलेश राणे यांच्या आरोपांमुळे केसरकर मतदारसंघात अपयशी ठरल्याचे सिद्ध..

⚡सावंतवाडी ता.२९-: आडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित खनिजयुक्त मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांचा सहभाग असू शकतो. मात्र, या प्रकरणामागे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा मोठा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. “या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल,” असेही त्यांनी म्हटले. तसेच चौकशी न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना राऊळ म्हणाले की, आडाळी एमआयडीसी परिसरात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे स्थानिक युवकांची चेष्टा केल्यासारखी आहे. “अनेक वर्षे या भागात कोणतेही उद्योगधंदे आले नाहीत. मात्र आता अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे समोर येत आहे, ही उद्योगमंत्र्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. तसेच आडाळी परिसरात हा प्रकार समोर असताना एमआयडीसीचे अधिकारी नेमकी करतायत काय…? त्यांनी सर्वप्रथम अहवाल उद्योग मंत्र्यांकडे दिला पाहिजे होता त्यामुळे पहिली कारवाई अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आज या भागातील सर्व युवकांची दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा” आरोप त्यांनी केला.तसेच, या प्रकरणावर स्थानिक आमदारांकडून कोणतीही भूमिका मांडली जात नसल्याने संशय अधिक बळावत असल्याचेही राऊळ यांनी सांगितले. “आजगाव परिसरातही खाण सर्वेक्षण सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबतही स्थानिक आमदार मौन बाळगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळेच मतदारसंघात असे प्रकार सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे,” असे ते म्हणाले.

त्यामुळे पहिली कारवाई अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आज या भागातील सर्व युवकांची दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा” आरोप त्यांनी केला.तसेच, या प्रकरणावर स्थानिक आमदारांकडून कोणतीही भूमिका मांडली जात नसल्याने संशय अधिक बळावत असल्याचेही राऊळ यांनी सांगितले. “आजगाव परिसरातही खाण सर्वेक्षण सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबतही स्थानिक आमदार मौन बाळगत आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळेच मतदारसंघात असे प्रकार सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे,” असे ते म्हणाले.

काल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र त्यांनी दीपक केसरकर यांचे नाव घेतले नाही. “केसरकर यांचे नाव घेणेही आवश्यक होते,” असा टोला राऊळ यांनी लगावला.दरम्यान, निलेश राणे यांनी मतदारसंघातील अवैध धंद्यांबाबत उपस्थित केलेले प्रश्न हे केसरकर यांच्या अपयशाचे द्योतक असल्याचा दावा राऊळ यांनी केला. “निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे मतदारसंघात सुरू असलेल्या गैरप्रकारांना राजकीय आश्रय असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे,” असेही ते म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना राऊळ यांनी इशारा दिला की, “या प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास आमदार महेश सावंत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच आडाळी एमआयडीसी परिसरात जाऊन प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा करण्यात येईल असे देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page