Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उद्या उ‌द्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट) कला महाविद्यालयाच्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उ‌द्घाटन बुधवार दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे जाहिरात तज्ज्ञ श्री. प्रशांत गोडबोले व विशेष अतिथी म्हणून श्री. विक्रम गायकवाड व श्री. सुनिल महाडिक हे जाहिरात क्षेत्रातील…

Read More

शक्तीपीठ मार्गाबाबत स्थानिक आमदार दिपक केसरकर गप्प का…?

काॅम्रेड संपत देसाई यांचा सवाल ; १२ मार्चच्या आंदोलनात कोकणातील शेतकरी सहभागी होणार* ⚡सावंतवाडी ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तीपीठ महामार्ग देण्याचा घाट शासन घालत असताना या भागाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार दीपक केसरकर गप्प का त्यांनी यासंदर्भात तोंड उघडावे असे आव्हान कॉम्रेड संपत देसाई यांनी आज येथे दिले.तर तब्बल 12 जिल्ह्यातील 27 हजार…

Read More

चिपी विमानतळासाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स प्रयत्नशील..

फ्लाय९१ विमान कंपनीसोबत सकारात्मक चर्चा:मुंबई विमानसेवेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निवेदन.. ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर हा विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष…

Read More

तारामुंबरी येथील मृत मच्छिमाराच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देणार…

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून होईल तात्काळ मदत:भाजपा मच्छिमार सेलची कुटुंबियांना ग्वाही.. ⚡कुडाळ ता.०४-: राज्याचे बंदर आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मृत मच्छीमार यांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन भाजपा मच्छीमार सेलने त्या कुटुंबीयांना दिले आहे. भाजप सिंधुदुर्गचे मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक.रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हि माहिती…

Read More

दोडामार्गच्या कन्येची गोवा क्रिकेट संघात निवड…

ऑलराऊंडर खेळाडू म्हणून झालीय निवड.. ⚡दोडामार्ग, ता.३-: तालुक्यातील खानयाळे येथील साक्षी बंड्या गावडे हिची महिलांच्या गोवा क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.साक्षी सध्या दहिसर, मुंबई येथे स्थायिक असून तिची २३ वर्षाखालील महिलांच्या गोवा क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निवड झाली आहे.साक्षीने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून तिच्या शैक्षणिक आणि…

Read More

तळवडे ७ मार्च रोजी येथे संगीत खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.०४-: श्री म्हाळाई देवी महिला मंडळ तळवडे शाळा नं. ९ येथे जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च रोजी खुली संगीत खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

Read More

मोबाईल दुकान व्यावसायिकानेच फोडले दुसऱ्या मोबाईल विक्रेत्‍याचे दुकान…

चोवीस तासात रोकडसह आरोपी ताब्‍यात ; पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कामगिरी.. ⚡कणकवली ता.०४-: शहरातील महामार्गालगत असलेले जय भवानी मोबाईल दुकान १ मार्चला अज्ञाताने फोडले होते. यात दुकानातील ४५ हजाराची रोकड लंपास झाली होती. या चोरीचा चोवीस तासात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी छडा लावला. यात रोकड चोरणारा दुसरा मोबाईल विक्रेताच निघाला. त्‍याला पोलिसांनी ताब्‍यात…

Read More

चराठा येथील भोसले नाॅलेज सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला पडले मोठे भगदाड…!

लक्ष वेधूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याची सरपंच प्रचिती कुबल यांची नाराजी.. सावंतवाडी : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. जीव मुठीत धरून खचलेल्या पुलावरून त्यांना प्रवास करावा लागत आहे. चराठा ग्रामपंचायत, येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधूनही, एवढंच नव्हे तर जनता दरबारात दाद मागूनही परिस्थिती बदलेली नाही. याउलट पुल अधिक…

Read More

बँकयोजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा…

मनिष दळवी:सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ.. ⚡सिंधुदुर्ग दि.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना विविध बँकीग सुविधांचा वापर करत असतांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखी सारखी सुविधा…

Read More

देवगड जामसंडे शहराचा प्रारूप विकास आराखड्यात लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प…

⚡देवगड ता.०३-: देवगड जामसंडे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे दर्शविण्यात आली असून न.पं.च्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराचा हा प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला.आराखड्यामध्ये दलदलीच्या ठिकाणी लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प करण्याचे दर्शविण्यात आले आहे. देवगड जामसंडे न.पं.ची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी सायंकाळी न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे,…

Read More
You cannot copy content of this page