लायन्स मदतीसाठी नेहमी तत्पर…

डॉ. किरण खोराटे:कुडाळ लायन्स क्लबचे पदग्रहण उत्साहात..

⚡कुडाळ ता.२०-: समाजात सामाजिक बांधिलकी जोपासून लायन्स ही सेवाभावी संस्था मानवतेची,समाजाची सेवा करत आहे. अनेक संकटात ही आंतरराष्ट्रीय संस्था मदतीसाठी नेहमीच अग्रेसर आहे असे प्रतिपादन एमजेएफ लायन डॉ किरण खोराटे यांनी लायन्स क्लब ऑफ  कुडाळ सिंधुदुर्गच्या पदग्रहण सोहळ्यात केले. हा सोहळा संगीतमय वातावरणात दिमाखात पार पडला. नूतन पदाधिकारी पदग्रहण, गुणवंत सत्कार व गरजूंना मदत असा भरगच्च कार्यक्रम पार पडला
  लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा 2025- 26 चा पदग्रहण सोहळा संगीतमय वातावरणात पदग्रहण अधिकारी डॉ किरण खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष  आनंद कर्पे पीएमजेएफ सीए अजित फाटक, झोनल चेअरमन अमेय पै,माजी अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर ,सचिव सागर तेली, खजिनदार जीवन बांदेकर, रोटरी क्लब कुडाळ अध्यक्ष राजीव पवार ,सचिन मदने, मकरंद नाईक ,तसेच लायन्स क्लबचे सावंतवाडी, मालवण तसेच गडहिंग्लज येथील पदाधिकारी आदी उपस्थित होते
    यावेळी बोलताना डॉ खोराटे म्हणाले, आपली लायन्स ही आंतरराष्ट्रीय  सेवाभावी संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य सर्वच क्षेत्रामध्ये नेहमीच मदतीच्या दृष्टीने कार्यरत असते.आज लायन्स क्लब कुडाळच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. या पदाचा वापर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करायचा आहे. कोणतेही काम करताना टीम वर्क फार महत्त्वाचे आहे.  लायन्सचे 210 देशांत सेवाभावी काम सुरू आहे. कोविडमध्ये शेकडो करोड रुपये मदतीसह अनेक सामाजिक उपक्रमात लायन्स हा सेवाभावी क्लब अग्रेसर राहिला आहे.
नूतन अध्यक्ष आनंद कर्पे यांनी आज लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कुडाळच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे .या क्लबच्या माध्यमातून काम करताना ज्येष्ठासह सर्वांच्या  मार्गदर्शनाखाली समाजात सेवाकाम करताना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सर्व क्षेत्रात काम करणार आहे.  मानवतावादी दृष्टीने नेतृत्व केल्यास आपण सर्व क्षेत्रात जिंकू शकतो असे सांगत  विविध उपक्रमाबरोबरच अंधत्व निवारण भूक निवारण, पर्यावरण संवर्धन  असे अनेक उपक्रम सर्वांच्या मदतीने राबवणार असल्याची जाहीर केले .यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी केलेले डॉ विवेक पाटणकर, मिलिंद बांदिवडेकर शालेय विद्यार्थिनी नुपूर कर्पे  यांचा लायन्स क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.  पाट येथील कुलदीप नेरुरकर या युवकाला आरोग्य उपक्रमांतर्गत आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी लायन्स नवीन सभासद म्हणून उद्योजक सुधीर झाडये, डॉ योगिता राणे, श्रीकृष्ण शिरोडकर, रमेश जोशी यांना क्लब मध्ये घेण्यात आले.    कुडाळ अध्यक्ष आनंद कर्पे , सचिव सी ए सागर तेली, खजिनदार जीवन बांदेकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपाध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शैलेश मुंडये ,मंदार शिरसाट ,सहसचिव डॉ दिपाली काजरेकर , सहखजिनदार गणेश म्हाडदळकर, तेमर डॉ सुशांता कुलकर्णी, ट्वेल्थीस्टर चैतन्य तेरसे ,पी आर ओ मिलिंद बांदिवडेकर, जीएसटी नयन भणगे ,जीएम टी ऍड नारायण वैद्य, जी एल टी अँड अमोल सामंत, जी एल टी  जयंती कुलकर्णी, क्लब मार्केटिंग मंजुनाथ फडके, एल सी आय एफ चेअरपर्सन  सुनेत्रा फाटक, संचालक पीएमजे सीए अजित फाटक, जी दत्ताराम ,ऍड अजित भणगे ,सीए सुनील सौदागर, काका कुडाळकर, मनोहर कामत, अँड समीर कुळकर्णी, डॉ अमोघ चुबे, मंदार परुळेकर, अँड श्रीनिवास नाईक ,अनंत शिंदे,  नयन भणगे, स्नेहांकिता माने, अस्मिता बांदेकर, डॉ विवेक पाटणकर ,मेंबरशिप ग्रोथ डॉ गौरव घुर्ये , चिन्मय सामंत, देविका बांदेकर, लीडरशिप  प्रशांत माने, अँड मिहीर भणगे, डायबिटीस अवेअरनेस डॉ  चेतना चुबे, डॉ सिद्धेश बांदेकर ,मेघा सुकी ,युथ प्रोग्राम  अनुप तेली, संतोष वारकणकर ,मनोज मठकर, एन्व्हायरमेंट राजन कोरगावकर ,साईट फर्स्ट सुजाता तेली, श्रद्धा खानोलकर ,रिलेव्हिंग हंगर गजानन तेली, विशाल देसाई,  मिलिंद बोर्डवेकर हेल्थ अवेअरनेस सुरज भोगटे, कुणाल वरसकर, फंड रायझिंग प्रकाश जैतापकर, प्रकाश नेरूरकर, अँड संग्राम देसाई ,बुलेटिन एडिटर विवेक धुरी, चिरायू बांदेकर, सुधाकर कुलकर्णी परमनंट प्रोजेक्ट संजीवकुमार प्रभू ,रोहन सामंत ,श्री भौमिक  एन्टरटेन्मेंट सोशल मीडिया कपिल शिरसाट ,नितीन दळवी ,सतीश सामंत ही नवीन टीम नवीन वर्षात काम करणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन लायन्स स्नेहा नाईक शोभा माने  यांनी केले आभार लायन अस्मिता बांदेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page