⚡मालवण ता.२०-:
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्काऊट गाईड व हरितसेना विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन व विक्री याला विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककला स्पर्धेत श्लोक समीर चांदरकर याने प्रथम क्रमांक तर गार्गी सुरेश कांबळी हिने द्वितीय क्रमांक पटकावीला
कोकणात पावसाळ्यात सगळीकडे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्याचा आपल्या सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचा होणारा फायदा विद्यार्थ्यांना समजावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात मिळणाऱ्या टाकळा,पेवगा , अळू, एक पान, खडकी, आळंबी, कुरडई, शेवगा लाल माठ, घोट्याचे वेल, कुड्याच्या शेंगा अशा विविध रानभाज्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये मांडल्या तसेच या भाज्यांपासून पौष्टिक पदार्थही बनवून आणले होते
रानभाजी पाककृती स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढील प्रमाणे तृतीय -शुभ्रा राजन नाईक, उत्तेजनार्थ – श्रीपाद सुभाष पाटील, सिद्धी विष्णू गावडे, देवांग नितीन नांदोसकर
या स्पर्धेसाठी सौ राजश्री पेणकर, सौ मधुरा माडये ,श्रीमती कांचन खानोलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्काऊट विभागाचे प्रमुख श्री समीर चांदरकर तसेच हरित सेना विभागाचे प्रमुख श्री बाळकृष्ण वाजंत्री यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त ) शिवानंद वराडकर ,ऍड.एस एस पवार , अध्यक्ष अजयराज वराडकर आणि संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांनी अभिनंदन केले आहे