कुडाळ मध्ये बैलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू…

कुडाळ : येथील मधली कुंभारवाडी येथील श्रीमती पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय ७०) हिला शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर व टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंडया मांजरेकर यांची ती आई होय.
श्री मांजरेकर कुंटूबियांनी एक महिन्यापूर्वी बैल घेतला होता. मात्र तो बैल मारायला यायचा. त्यामुळे त्यांनी हा बैल विकण्याचा निर्णय घेतला होता. आज पहाटे या बैलाला नेण्यासाठी एक ईसम आला होता. घरापासून सुमारे १०० ते १५० मिटर अंतरावर टॉवरकडे टेम्पो लावण्यात आला. त्यांच्या ताब्यात बैल देण्यासाठी तिथपर्यंत बंडया मांजरेकर व त्यांची आई बैलाला घेऊन गेली होती. टेम्पो कडे पोहचल्यावर अचानक पुढे चाललेल्या आईवर बैलाने हल्ला केला. तिच्या मांडीत बैलाचे शिंग घुसल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिला तात्काळ कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला तीने प्रतिसाद दिला नाही. त्यातच तिचे निधन झाले.
त्यांची मुलगी सुरत येथून व अन्य नातलग मुंबईतून आल्यावर आज रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती मांजरेकर यांचे निधन झाल्याचे समजताच कुडाळ शहरासह अन्य भागातील नातलग नागरीक यांनी मांजरेकर कुटुंबियांच्या घरी येत सात्वन केले.
श्रीमती मांजरेकर यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुडाळ नगरपंचायतीचे कुंभारवाडी प्रभागाचे नगरसेवक उदय मांजरेकर व टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंड्या मांजरेकर यांची ती आई होय. श्रीमती मांजरेकर कष्टाळू होत्या. घरचा भार त्याच वाहत असत.

You cannot copy content of this page