⚡वेंगुर्ले ता.१९-: प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक स्व. वसंत तावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी ‘साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा २०२५’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेसाठी मराठी कथेसाठी किमान ३००० ते कमाल ४००० एवढी शब्दमर्यादा आहे. प्रथम पारितोषिक रु. १५,०००/, द्वितीय रु. १०,०००, तृतीय रु. ७,५००, प्रथम उत्तेजनार्थ रु.५०००, द्वितीय उत्तेजनार्थ रु.५,००० अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे तसेच नियमांनुसार सर्वोकृष्ट विनोदी कथालेखनास प्रोत्साहन म्हणून विनोदी कथा पारितोषिक दिले जाईल. ही स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली आहे स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही कथा लेखकाने स्वतः लिहिलेली असावी. इच्छुकांनी ३१ ऑगस्टपर्यंत कथा पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी प्रबोधन व श्रीडाभवन येथे रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात किवा ७५०६७६०६७६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा. prabodhankridabhavan2014@gmail.com या ई-मेल वरदेखील इच्छुकांना कथा पाठवता येईल. मराठी कथा लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्ळावे असे आवाहन ‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक’तर्फे करण्यात आले आहे. २०२४ पासून वरील स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष पहिल्याच वर्षी स्पर्धेला लेखकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता स्पर्धेचे माहितीपत्रक प्रबोधन क्रीडाभवन कार्यालयात उपलब्ध आहे. ते स्पर्धकांना वॉटसअप वरून मागविता येईल. पारितोषिक विजेत्या कथा ‘साप्ताहिक मार्मिक’ मध्ये प्रसिद्ध केल्या जातील. ही स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली आहे.
साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेचे आयोजन…
