⚡मालवण ता.१९-:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
मालवणात भाजपतर्फे २२ रोजी रक्तदान शिबीर…!
