Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेशोत्सवात स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या…

परप्रांतीय व्यावसायिकांची मक्तेदारी खपवून घेणार नाही: उबाठा शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांचा पालिका प्रशासनाला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०१-:सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक फळ फूल भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यवसायिकाना नगरपालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे या ठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका…

Read Full News

राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याच्या मार्गदर्शन शिबीराला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू, राज्य पंच आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर याने सावंतवाडीत घेण्यात आलेल्या विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीरात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण येथील सव्वीस विदयार्थ्यांनी शिबीराचा…

Read Full News

मच्छिमारी करणारी होडी समुद्रात उलटून दोघांचा बुडून मृत्यू…

सकाळी सहाची घटना:एकला वाचविण्यात यश.. ⚡मालवण ता.०१-:मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करत असताना लाटांच्या तडाख्यात एक मासेमारी नौका पलटी झाल्याने मालवण दांडी येथील नौका मालक तसेच मच्छिमार नेते सन्मेष सुरेश परब व अक्षय हनुमंत राणे या दोन मच्छिमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग सन्मेष परब याला वाचविण्यात यश…

Read Full News

पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांचा मठ येथे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०१-:भाजपच्या ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मठ ग्रामपंचायत सरपंच रूपाली नाईक यांच्या हस्ते मठ श्री शिवाजी चौक येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी अजित नाईक, शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत नाईक, माजी मठ ग्रा.पं. सदस्य समीर मठकर, अनिल तेंडोलकर, अवी खानोलकर, बाळू मठकर, कानू गावडे, श्री. धुरी,…

Read Full News

वेंगुर्लाची आमसभा शांततेत व पंचायत समितीच्या सुयोग्य नियोजनात संपन्न….!

भाजपचे हितेश धुरी, भूषण आंगचेकर, कमलेश गावडे आक्रमक…. वेंगुर्लाप्रदीर्घ कालावधीनंतर वेंगुर्लाची आमसभा वेंगुर्ला न. प. नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आ. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली. वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांनुसार एमईसीबी, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग यांची सभापती, उपसभापती संबंधित विभागाचे उपअभियंता व संबंधित गावातील ग्रामस्थ, शिक्षण व आरोग्य सभापती यांची…

Read Full News

युवा सेना तालुकाप्रमुख कॅल्ट्स फर्नांडिस याचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी, ता. ३१-: सावंतवाडी शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख कॅल्ट्स फर्नांडिस यांचा वाढदिवस आज आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅल्ट्स फर्नांडिस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सर्व राजकीय…

Read Full News

वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’च्या मागणीला मंजुरी

नगरसेवक राकेश राणे यांचे राणे बांधवांसह ग्रामस्थांनी मानले आभार कणकवली :वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ या नामकरणासाठी नगरसेवक राकेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल राणे बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले.महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाची प्रेरणा…

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी कुडाळच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला दणका…

नगरसेवक, नागरिकांचा PWD कार्यालयात तब्बल ४ तास ठिय्या:उद्यापासून युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे लेखी आश्वासन.. ⚡कुडाळ ता.३१-: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही कुडाळ शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, रखडलेली दुरुस्ती आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांसह चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात संतप्त होत नगरसेवक अभिषेक…

Read Full News

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट…

नसबंदीच्या निधीच्या वापराबाबत मनसे आक्रमक ; ७ दिवसांत कारवाई न झाल्यास पालिका गेटसमोर कुत्रे बांधण्याचा इशारा… मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या नियमित आणि योग्य नसबंदीचा अभाव, वाढते हल्ले आणि शासकीय रुग्णालयातील रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा याविरोधात मनसेने…

Read Full News

देऊळवाडा-सातेरी परिसराचा वीजप्रश्न सुटला; १५ लाखांत नवीन ट्रान्सफॉर्मर…

⚡मालवण,ता.३१-:देऊळवाडा ते सातेरी मंदिर परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची व वारंवार वीजखंडित होण्याची समस्या आता दूर होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांच्या नियोजन निधीतून नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला असून, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी दोन…

Read Full News

You cannot copy content of this page