सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस ‘…

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. कोकणातील जनतेची, रेल्वे प्रवासी संघटनेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे.

नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला नवीन नाव देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने लवकरच नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून प्रा. मधू दंडवते यांच्याकडे पाहिल जात. रेल्वे प्रवासी संघटनेकडून त्यांचे नाव स्थानकाला दिले जावे यासाठी मागणी करण्यात आली होती. मंत्रिमंडळाची मंजुरी याला आज मिळाली आहे

You cannot copy content of this page