मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर समोरील रस्त्यावर भला मोठा खड्डा…

अवजड वाहतुकीमुळे सदरील खड्डा अधिकच रुंदावतोय;अपघाताची दाट शक्यता..

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर श्री गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर पडलेला अपघाती खड्डा रुंदावत असून सुद्धा या खड्ड्याबाबत बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे काय बांधकाम विभाग ?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
सदरील रस्त्यावरील खड्डा हा येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून दगड, वाळू,सिमेंट ने बुजविला होता. मात्र सद्य स्थितीत रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने हा खड्डा अधिकच रुंदावत आहे.
सदरील खड्डा जवळ जवळ पाच फूट लांबीचा तर एक फूट खोल असून याबाबत लवकरात लवकर बांधकाम विभागाने दखल घेऊन या खड्ड्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी वाहनचालक,ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page