कणकवली : संकल्प प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड या विषयावरील एक दिवसाची कार्यशाळा अतिशय उत्साहामध्ये पार पडली. ही कार्यशाळा २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळामध्ये कणकवली येथील भवानी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणास महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून मुंबई पुणे – कोल्हापूर – गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ४० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी ? लागवड करताना कोणत्या जाती निवडाव्यात ? रोपांची निवड दर्जा विविध जातींची माहिती आणि लागवडीनंतरचे व्यवस्थापन तसेच एक एकर बांबू लागवडीसाठी येणारा अंदाज पत्रकीय खर्च तसेच व्यावसायिक उपयोगाच्या बांबूच्या जाती अशा विविध बांबू मधील विषयांवर चर्चा झाली व प्रशिक्षणार्थींचे प्रश्नोत्तरांनी शंका समाधान केले सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. बांबूच्या विविध हस्तकला वस्तू बांबूपासून बनवलेली गोलाकार काड्या आणि बांबू पासून बनवलेली कार्बन युक्त खाते विविध वस्तूं, बांबू कपडे अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडणी करण्यात आली होती, विविध बांबूंच्या जातींची रोप आणि नमुनायुक्त बांबू तसेच बांबू विषयी पुस्तक या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते
संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरादअली शेख यांनी प्रस्तावना करताना कोकणात बांबू लागवडीचे महत्व व कार्यशाळेमागचा उद्देश यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मास्टर ट्रेनर अरुण वांद्रे सदस्य गव्हर्निंग कौन्सिल यांनी बांबू लागवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले बांबू सोसायटीऑफ इंडियाची ओळख आणि कार्य सोसायटीचे सदस्य सुरेश खोत यांनी करून दिली बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य सुरेश माळी यावेळी उपस्थित होते.
संकल्प प्रतिष्ठान गेली १५ वर्षे सातत्याने उद्योग, व्यवसाय व कृषी विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करीत असून त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे सचिव अमोल भोगले, कार्यक्रम समन्वयक अमोल परब, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर उपरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
