Headlines

Global Maharashtra Breaking News

चाकरमान्यांच्या आग्रहाला मान; ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल!

*११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती:भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग.. ⚡कणकवली ता.०१-:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या तारखांऐवजी आता ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकाच्या…

Read Full News

कणकवली तालुक्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; १३ हजार १६ मतदार वगळले

तालुक्यात आता ९५ हजार ८५३ मतदार; ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार कणकवली : तालुक्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ९५ हजार ८५३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४७ हजार ९९६ पुरुष मतदार आणि ४७हजार ८५७ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण १३८ मतदान केंद्रे आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची…

Read Full News

हीर्लोकमध्ये वीजवाहिनी तुटून दोन जनावरे दगावली…

शेतकऱ्याला तीन लाखांची मदत देण्याची मागणी:तुटपुंजी मदत दिल्यास महावितरणच्या कुडाळ कार्यालयावर शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०१-: हीर्लोक-भटवाडी येथे वीजवाहिनी तुटून अंगावर पडल्याने शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय आणि दुभती म्हैस अशी दोन जनावरे जागीच दगावली. या घटनेमुळे शेतकरी परब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना किमान तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी,…

Read Full News

गाव तेथे काँग्रेस अभियान राबविणार; तालुका काँग्रेसच्या बैठकीत निर्णय…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर व जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी काळात ‘गाव तेथे काँग्रेस’ अभियान राबवून गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महागाईच्या विरोधात आंदोलन करण्याबरोबरच काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी गावागावांत संपर्क…

Read Full News

अरविंद मोंडकर यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार…

⚡मालवण ता.०१-:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘सृजन संघटन’ या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले अरविंद मोंडकर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘सृजन संघटन’ उपक्रम राबविण्यात येत…

Read Full News

संतांच्या सानिध्यातच खरा आनंद…

गुरुमाऊली शोभाताई:संसार न सोडता परमार्थाचा मार्ग अवलंबा.. ⚡सावंतवाडी ता.०१-: संतांच्या सानिध्यात खरा आनंद आहे. थोर संत, महंतांनी देखील हा उपदेश आपल्याला दिला असून समर्थ रामदासांनी दासबोधातून भक्तीमार्ग विषद केला आहे. तर संसार, प्रपंचाचा त्याग न करता योग्य विचार व परमार्थाचा मार्ग काडसिध्देश्वर स्वामी महाराजांनी दाखवला आहे. त्याचे पालन करावे, असा उपदेश काडसिध्देश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली…

Read Full News

आडाळी एमआयडीसीत आणखी एका मोठ्या उद्योगाची भर…

ऑटोमेज कंपनीची २५० कोटींची गुंतवणूक; ५०० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार; आमदार दीपक केसरकर.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळणार असून, येथे ऑटोमेज कंपनीच्या माध्यमातून तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नवीन उद्योग साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ५०० हून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार दीपक…

Read Full News

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेचे नियोजन

रस्ते, विसर्जन स्थळे, पार्किंग व स्वच्छतेबाबत प्रशासनाची तयारी मालवण (प्रतिनिधी) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय भासू नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित नियोजन बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन स्थळांची व्यवस्था, पार्किंग नियोजन आणि अग्निशामक दलाची तत्परता यांसारख्या विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले….

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी मतदारसंघाला १५ नव्या एसटी बस…

आम. दीपक केसरकर: सावंतवाडी बसस्थानकाच्या आराखड्यात बदलांच्या सूचना; तिन्ही आगारांसाठी मिनीबस देण्यास तत्त्वतः मंजुरी.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आज मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यांतील एसटी सेवेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली….

Read Full News

काजू नुकसानभरपाईपासून तांबोळीतील शेतकरी वंचित

गणेश चतुर्थीपर्यंत रक्कम न मिळाल्यास कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा बांदा/सकाळ वृत्तसेवातांबोळी गावातील अनेक शेतकऱ्यांना काजू पिकाच्या नुकसानीपोटी मंजूर झालेली नुकसानभरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गणेश चतुर्थीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा तांबोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांनी दिला…

Read Full News

You cannot copy content of this page