⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर व जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आगामी काळात ‘गाव तेथे काँग्रेस’ अभियान राबवून गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महागाईच्या विरोधात आंदोलन करण्याबरोबरच काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी गावागावांत संपर्क अभियान राबविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. यावेळी राजू मसुरकर यांनी आरोग्य सुविधांबाबत उपस्थितांना माहिती दिली.
महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीबाबत मार्गदर्शन केले. निरीक्षकांनी ‘गाव तेथे काँग्रेस’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
बैठकीदरम्यान माजी आमदार स्व. पुष्पसेन सावंत यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सावंतवाडी महिला शहराध्यक्षपदी सुमेधा सावंत व उपाध्यक्षपदी निषाद बुरान यांची निवड करण्यात आली. नियुक्तीनंतर निरीक्षकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, रवींद्र म्हापसेकर, सुभाष दळवी, नगरसेवक तौकीर शेख, अॅड. राघू नार्वेकर, पीटर फर्नांडिस, कौस्तुभ पेडणेकर, आनंद आयरे, विठ्ठल केदार, सगुणगावकर, संतोष कासकर, संदीप सुखी, बाळा नमशी, महेश चितारी यांच्यासह युवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
