Headlines

Global Maharashtra Breaking News

भंडारी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुकास्तरीय १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सानिका अमित ठाकूर (इयत्ता ११वी विज्ञान) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षिता महेश तारी (इयत्ता ११ वी वाणिज्य) हिने चतुर्थ क्रमांक वभावेश रामचंद्र कुबल (इयत्ता ११ वी विज्ञान) याने तृतीय क्रमांक…

Read Full News

संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या ६७ प्रकरणांना मंजुरी

कणकवली : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा बुधवार ९ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध शासकीय योजनांअंतर्गत एकूण ६७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ही सभा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार दीक्षांत…

Read Full News

शंकर महादेव विद्यालयाच्या कुस्तीपटूंचे तालुकास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश…

गुरुप्रसाद नाकील व सोहम पकाले यांचा वजनी गटात प्रथम क्रमांक: जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.. ⚡कणकवली ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडेच्या कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात…

Read Full News

सावंतवाडीच्या सुपुत्राची लेफ़्टनंटपदी झेप !

अनिकेत वाडकर यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड कुडाळ : जबरदस्त इच्छाशक्ती, मनात असलेली देशभक्ती तसेच जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीच्या सुपुत्राने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी झेप घेतली आहे. मुलाचे सावंतवाडीचे आणि सध्या वडिलांच्या नोकरी निमित्त रत्नागिरीत वास्तव्यास असलेले अनिकेत निलेश वाडकर यांची नुकतीच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. बिहार मधील गया येथे त्यांचे…

Read Full News

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प…

ना. नितेश राणे:चिपी विमानतळावर एमटीडीसीचे पर्यटन माहिती केंद्र सुरु.. ⚡वेंगुर्ला ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने चिपी विमानतळावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकृत पर्यटक माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्गात हवाई मार्गाने दाखल होणाऱ्या पर्यटकांचे स्वागत अधिक सुनियोजित पद्धतीने होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासाला मोठी गती…

Read Full News

माडखोलमध्ये कृष्णा राऊळ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा…

शाळेला ब्लूटूथ स्पीकर, माजी सैनिकांचा गौरव; स्वामी समर्थ मठाला इन्व्हर्टर-बॅटरीची भेट.. ⚡सावंतवाडी ता.११-: माडखोल गावचे उपसरपंच तथा माडखोल सेवा संस्था सोसायटीचे चेअरमन कृष्णा राऊळ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थ व विविध संस्थांना उपयोगी वस्तूंची भेट देत आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला.माडखोल…

Read Full News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांद्यात वाहतुकीचे नियोजन

११ ते १३ सप्टेंबरदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक; चार ठिकाणी बॅरिकेडिंग बांदा/प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन बांदा पोलिस ठाण्याच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहावी, वाहनांची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक तसेच…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना…

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा:चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मुंबई दि.११-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या…

Read Full News

शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षक अनिल वरक यांचा विशेष सन्मान…

⚡बांदा ता.११-: पाडलोस येथील शाळेचे शिक्षक अनिल वरक यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जनजागृती सेवा संस्था, ठाणे यांच्या वतीने त्यांच्यासह शाळेतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.या कार्यक्रमाला जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ…

Read Full News

काजू-आंबा नुकसान भरपाईसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी युद्धपातळीवर करा

पात्र शेतकऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी मदत मिळण्यासाठी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाची मागणी बांदा/प्रतिनिधीयंदाच्या काजू-आंबा हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोहर करपणे व कुजल्याने कोकणातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघटनांनी जिल्हा पातळीवर आंदोलने, मोर्चे काढत थेट मुख्यमंत्री निवासापर्यंत धडक दिली. त्यानंतर कोकणातील आमदारांनीही अधिवेशनात शेतकऱ्यांची बाजू मांडत शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. या आंदोलनांची दखल…

Read Full News

You cannot copy content of this page