कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे-तेरसे बांबर्डे सीमेवर चालत्या डंपरला आग लागली. डम्परचा जॉईंट तुटून डिझेल टाकीवर बसला आणि टाकी फुटली. चालत्या डम्परचा तो जॉईंट रस्त्यावर घासून ठिणगी उडाली आणि डंपरने पेट घेतला. चालकाने नियंत्रण मिळवून डंपर उभा केला. या अपघातात चालक सुखरूप असून हा डंपर निगुडे बांदा येथिल असल्याचे बोलले जात आहे.

