Global Maharashtra Breaking News

शिक्षणमहर्षी रामभाऊ परुळेकर यांची जयंती साजरी…

⚡मालवण ता.१०-:शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च योगदानाबद्दल ‘शिक्षणमहर्षी’ ही उपाधी लाभलेले रामभाऊ परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परुळेकर यांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या शैक्षणिक विचारांची प्रेरणा घेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते…

Read More

आपले शब्द, वागणे व आहार हे पहिले गुरु…

डॉ. राहुल पंतवालावलकर:भंडारी हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी… मालवण (प्रतिनिधी) आपले शरीर हे पंचमहाभूतांप्रमाणे असून आपले शब्द, आपला स्पर्श, वागणे आणि आपला आहार हे आपले पहिले गुरु असून यांच्यामुळेच आपल्या शरीराचा आणि एकूण व्यक्तिमत्वाचा विकास होतो, आपले बोलणे चांगले हवे, आपले वागणे व हावभाव नीटनेटके हवे तसेच योग्य आहार हवा, तरच आपण आपली प्रगती साधू शकतो. आपण…

Read More

गुरूपौर्णिमेचा गोपाळकाला उत्साहात संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१०-: भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आज पौर्णिमेचा गोपाळकाला उत्सव अबालवृद्धांच्या सहभागात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या काल्याची सुरूवात भजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित लहान मुलांनी विविध पारंपारीक खेळ खेळत जुन्या खेळांची आठवण करून उत्साहात दहीहंडी फोडली. त्यानंतर कुबलवाडा मारूती मंदिर, साकव ओहोळ, रामेश्वर मंदिर, नरसिह मंदिर, कुळेश्वर मंदिर यांना भेट देत…

Read More

मालवणात देवळी समाजातर्फे विद्यार्थी सत्कार आणि वधू- वर सूचक मेळावा…

⚡मालवण ता.१०-:सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ, शाखा मालवण तर्फे विद्यार्थी सत्कार सोहळा आणि वधु-वर सुचक मेळावा रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी १०. ३० वा. लिलांजली हॉल, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मालवण तालुक्यातील देवळी समाजातील ज्ञाती इ. ५ वी ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि पहिली ते उच्च शिक्षीत पदवी…

Read More

टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला; एका संशयिताला अटक…

⚡सावंतवाडी ता.१०-: कळंगुट येथील 65 वर्षीय टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर बुधवारी रात्री मालपे येथे पाच ते सहा जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वेंगुर्लेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी वेंगुर्लेकर यांची टॅक्सी कळंगुट ते बांदा-सावंतवाडीपर्यंतचे भाडे असल्याचे सांगून बुक केली होती. पाच भाडेकरूंसह टॅक्सी सावंतवाडीच्या दिशेने निघाली….

Read More

गुरुपौर्णिमे निमित्त आकेरी येथील स्वामी समर्थ मठात संदिप गावडे यांच्या हस्ते महाआरती…!

⚡सावंतवाडी ता.१०-: गुरुपौर्णिमे निमित्त आकेरी घाडीवाडी येथे स्वामीसमर्थ मठात महारतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यानिमित्त भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांना या महाआरतीचा मान देण्यात आला. गुरुपौर्णिमे निमित्त संदिप गावडे यांनी स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले.

Read More

प्रणया चव्हाण हिचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी प्रणया दत्ताराम चव्हाण हिने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ७०.२७ टक्के गुण मिळवून जिल्हास्तरावर २० वा क्रमांक प्राप्त करीत यश मिळविले आहे. प्रणया चव्हाण हिला प्रशालेतील शिक्षक श्री. राणे, श्रीमती फर्नांडिस, सौ. तोडणकर, सौ. सावंत, श्री. पराडकर यांचे…

Read More

प्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष उद्या सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये देणार धडक…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी- माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी आणि प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना राणे समर्थक धमकी देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या शुक्रवार दि. ११ जुलै २०२५…

Read More

जानवली – कृष्णनगरी येथील मंदिरातून चोरीला गेलेली दत्तमूर्ती गुरुपौर्णिमे दिवशीच सापडली…

पोलीस घटनास्थळी दाखल; पुढील तपास सुरू :मात्र काही प्रश्न हे अनुत्तरितच.. कणकवली : तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून ५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरीला गेलेली श्री दत्तमूर्ती गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. कृष्णानगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती दिली. कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे…

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश…

विभव राऊळ तालुक्यात दुसरा व जिल्ह्यात तिसरा :सारा नाईक तालुक्यात दुसरी व जिल्ह्यात एकोणिसावी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: शिष्यवृत्ती परीक्षा 2024 -25 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्वल यशाची परंपरा कायम राखली. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) प्रशालेचे तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण…

Read More
You cannot copy content of this page