आमदार महेश सावंत:“तळवडे मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकणार”..
⚡सावंतवाडी ता.०२-: विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ हे निष्ठावंत कार्यकर्ते असून जनता त्यांच्या पाठीशी राहील असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रचारार्थ तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी ते बोलत होते.
आम. सावंत म्हणाले, जनतेची साथ आम्हाला आहे. त्यामुळे समोर कितीही मोठी शक्ती असली तरी आम्ही लढू अन् जिंकू. माझ्याविरोधात देखील मोठी शक्ती होती. मात्र, शिवसैनिकांची ताकद व जनतेची साथ आम्हाला असल्याने आमचा विजय होईल असं मत व्यक्त केले. दरम्यान, जिल्हा परिषद उमेदवार रूपेश राऊळ म्हणाले, नेमळे गावचा सुपुत्र असल्याने गाव माझ्या सोबत राहील. तसेच तळवडे, मळगाव, निरवडे गावाचीही साथ आम्हाला आहे. त्यामुळे दोन्ही पंचायत समितीसह जिल्हा परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास श्री. राऊळ यांनी व्यक्त केला. यावेळी मळगाव पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग राऊळ यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
