Headlines

Global Maharashtra Breaking News

सत्तेच्या व पैशाच्या ताकदीसमोर न झुकणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा ‘सावंतवाडीत’ गौरव…

⚡सावंतवाडी ता.१९-: प्रचंड सत्तेची ताकद, पैसा आणि बळाचा वापर करून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, सर्व आव्हानांना तोंड देत ताठ मानेने जनतेच्या दरबारात उभे राहिलेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान सोहळा सावंतवाडीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची…

Read Full News

वेताळबांबर्डे येथे कार आणि दुचाकीचा अपघात…

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे दुर्घटना.. ⚡कुडाळ ता.१९-: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे येथे आज दुचाकी आणि चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, होंडा अमेझ कार (MH 05 EQ 6515) ही कुडाळच्या दिशेने जात होती. याच वेळी हिरो…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या मुलीचा मृत्यू…

⚡मालवण ता.१९-:शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालकांचा २५ ते ३० जणांचा समूह आज सकाळी शिवजयंती निमित्ताने मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. या समूहामध्ये अस्मी गोविलकर ही शाळकरी मुलगी…

Read Full News

ओरोस येथे शिवजयंतीचा जल्लोष…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची प्रमुख उपस्थिती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओरोस फाटा येथील छत्रपती…

Read Full News

महिला ढोल ताशा पथकाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा …

⚡देवगड ता.१८-:सिंधु संजीवन संस्था संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगड यांच्या द्वितीय वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात श्री रामेश्वर हायस्कूल, मिठबांव येथे संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील महिला, विद्यार्थी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्सवी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे…

Read Full News

कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवनाचे भव्य भूमिपूजन…

⚡कणकवली ता.१९-: शिवजयंतीचे औचित्य साधत कणकवली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व कलाकार उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे. या सोहळ्यास…

Read Full News

सावंतवाडी जिमखाना मैदान येथील लॉन टेनिस ग्राउंडचे अँड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१९-:शहरातील क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या लॉन टेनिस ग्राउंडच्या उभारणीसाठी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर साहेब यांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरपरिषदेमधील सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील युवकांना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या लॉन…

Read Full News

कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्यावतीने सरपंच गुणाजी गावडे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच गुणाजी गावडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या सत्कार समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, पंचायत समितीचे नवनिर्वाचित…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अर्चित पोकळे, सुभाष गावडे आदी उपस्थित होते

Read Full News

स्वराज्य अवतरले…! सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष…

“स्वराज्य संघटनेचे आयोजन: विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती; युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ…

Read Full News

You cannot copy content of this page