Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेशोत्सवात विशाल परब यांच्याकडून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात…

वेंगुर्ल्यात गणेश चतुर्थीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप.. ⚡वेंगुर्ला, ता. १३-: गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील गरजू घटकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण ठरावा, या भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला. गणेश चतुर्थीनिमित्त दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना..

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दाखवला झेंडा.. ⚡मुंबई दि.१३-: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून मंत्री नितेश राणे यांनी झेंडा दाखवत विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी पहिली…

Read Full News

वैश्यवाणी समाजाच्या जात प्रमाणपत्रांचा मार्ग मोकळा…

हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि हिंदू वैश्यवाणी या तिन्ही नोंदी वैश्यवाणीच:पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡कणकवली ता १३-: वैश्यवाणी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील वैश्यवाणी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि हिंदू वैश्यवाणी…

Read Full News

कुडाळ रोटरी क्लब कडून २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

कुडाळ : ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ’ तसेच प्लास्टिकमुक्त कुडाळच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बाजारपेठ आणि कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल २ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्यात आले. ‘प्लास्टिकची पिशवी नको, कापडी पिशवी हवी’ असा संदेश देत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.कुडाळ रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांना कापडी…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे दोन रजिस्टर गायब…

कर निर्धारण अधिकारी रजेवर असताना रजिस्टर हाताळून विल्हेवाट लावल्याचा आरोप; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी, ता. १३ -: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टरची विल्हेवाट लावल्याप्रकरणी नगरपरिषदेतील कर्मचारी भारत बाबू लाखे यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात…

Read Full News

पाल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गावडे यांची बिनविरोध निवड

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातीलपाल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास अनंत गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाल विकास सोसायटी संचालक पदीही ते कार्यरत असून यावेळी पाल ग्रामपंचायत सरपंच कावेरी कमलेश गावडे यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी या सभेत, उपसरपंच प्रीती गावडे, ग्रामपंचायत अधिकारी अमर गाडेकर, सदस्य श्रीकांत गावडे, शामल केरकर, विनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रदीप मुळीक,…

Read Full News

सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

आजारपणाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी; जिल्हाभरातून हळहळ व्यक्त कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर रामा कदम (रा. पोखरण) यांचे आज पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भजन…

Read Full News

आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदीमयूर आरोलकर यांची बिनविरोध निवड …

⚡वेंगुर्ला ता.१३ अजय गडेकर-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते मयूर गुरुनाथ आरोलकर यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. प्रशासकप्रशांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी माजी सरपंच समीर कांबळी, माजी उपसरपंच किरण पालयेकर महादेव नाईक, अक्षय भगत, विलास चिपकर, अपर्णा कांबळी, विद्या नवाथे, अक्षता…

Read Full News

वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यात व शहरात रिक्त असलेल्या शाखाप्रमुखांच्या नेमणुका झाल्या असून आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने कार्य करण्याचा निर्णय शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा शुक्रवारी बॅरिस्टर नाथ पै सभागृह येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या…

Read Full News

भाविकांच्या सेवेत भाजपचा सेवाभावी उपक्रम…

भाविकांच्या सेवेसाठी भाजपचा उपक्रम; सावंतवाडी तालुक्यातील बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, बांदा व आंबोली मंडलातील सर्व बुथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना भाविकांसाठी पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना धार्मिक…

Read Full News

You cannot copy content of this page