Headlines

Global Maharashtra Breaking News

उपरलकर देवस्थानजवळ ट्रक रेलिंगला धडकला…

चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने अपघात; चालक सुखरूप.. ⚡सावंतवाडी, ता. १७-: सावंतवाडी शहरातील उपरकर देवस्थानजवळील वळणावर ट्रकचालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला जाऊन धडकला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती…

Read Full News

शाळा, शिक्षण वाचवा मंचतर्फे २० रोजी गोपुरीत सहविचार सभा…

२ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन:विविध शैक्षणिक प्रश्नांवर होणार चर्चा.. ⚡कणकवली ता.१७-: शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचच्यावतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वामुदे-गोपुरी आश्रम येथे कणकवली तालुका सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याच्या अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे….

Read Full News

कणकवली न. पं.चा पंप, घंटागाडीची बॅटरी चोरीला

पटवर्धन चौक भाजी मार्केट परिसरातील घटना; १० हजारांचा मुद्देमाल लंपास कणकवली : नगरपंचायतीच्या मालकीचा १ एचपी सबमर्सिबल पंप आणि घंटागाडीची बॅटरी असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पटवर्धन चौक येथील भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्या सोनाली वामन खैरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार…

Read Full News

४० वर्षांनंतर वाळके परिवारात देखाव्याच्या परंपरेचे पुनरुज्जीवन

तरुण पिढीचा पुढाकार; भक्ती, परंपरा आणि कौटुंबिक एकजुटीचा अनोखा संगम ⚡बांदा ता.१७-: तब्बल ७८ वर्षांची अखंड गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या बांदेश्वर मंदिर परिसरातील वाळके परिवाराने यंदा जवळपास चार दशकांनंतर गणपतीसमोरील देखाव्याची जुनी परंपरा पुन्हा सुरू केली आहे. परिवारातील तरुण पिढीने पुढाकार घेत साकारलेल्या या देखाव्यात पारंपरिक कलाशैलीसोबत आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. बांदेश्वर मंदिरानजीक…

Read Full News

वेरळ गावातून परप्रांतीय फेरीवाल्यांना हटवा

मनसेची ग्रामपंचायतीकडे मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वेरळ गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्यामुळे सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वेरळ गावात फिरणाऱ्या सर्व परप्रांतीय आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कायदेशीर बंदी घालून त्यांना गावातून हटविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेरळ ग्रामपंचायतीकडे करण्यात…

Read Full News

सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा…

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे:प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश.. ⚡मुंबई, दि. १६ -: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि सर्व आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न वेळ न दवडता मार्गी लावून कामे…

Read Full News

जुन्या आठवणींना उजाळा देत आरोस हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…

भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती; शाळेच्या प्रगतीसाठी योगदानाचा निर्धार.. ⚡सावंतवाडी , ता. १६-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीबाबत विविध विषयांवर संवाद साधला. शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्र-मैत्रिणींसोबतचे…

Read Full News

न्यायाधीश अमित जामसंडेकर यांचे आचरा रामेश्वर मंदिरात दर्शन…

⚡मालवण ता.१६-:मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांनी सहपत्नीक आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला भेट देत श्रीदेव रामेश्वर तसेच मंदिरात विराजमान असलेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आचरा येथील वैशिष्ट्यपूर्ण ४१ दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा व धार्मिक विधींची माहिती जाणून घेतली.श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर न्यायाधीश जामसंडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसह निरोगी व…

Read Full News

राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संगठनच्या जिल्हा सरचिटणीसपदी सुरेश बापर्डेकर

मालवण (प्रतिनिधी) राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण एवं जन कल्याण संगठनच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सुखाजी बापर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेने दि.२४ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे नूतनीकरण केले असून, त्यांचा कार्यकाळ २४ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२८ असा राहणार आहे. संस्थेच्या दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार श्री. सुरेश बापर्डेकर यांच्या कार्याचा…

Read Full News

कुडाळ तहसील कार्यालयात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढणार कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुडाळ तहसील कार्यालयाच्या वतीने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय तसेच मंडळ अधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली महसुली अर्धन्यायिक प्रकरणे आपसी तडजोडीने आणि गतीने निकाली काढण्यात येणार आहेत.या अभियानामध्ये संबंधित प्रकरणांतील…

Read Full News

You cannot copy content of this page